फिल्म रिव्ह्यु : हिरोपंती

May 23, 2014 11:24 PM0 commentsViews: 3968

अमोल परचुरे, समीक्षक

हिरोपंतीचे प्रोमोज बघूनच हे लक्षात आलं होतं की, ऐशीच्या दशकात आलेल्या हिरो या जॅकी श्रॉफच्या सिनेमाची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न आहे. टायगर श्रॉफ या आपल्या मुलाला मोठ्या दणक्यात रिलीज करायचं जॅकीमधल्या बापाला वाटणं साहजिक आहे, पण टायगरची एंट्री दणकेबाज व्हावी यासाठी केवळ चकाचक सिनेमा असून चालणार नाही तर त्याला एक चांगली गोष्ट आणि तिला न्याय देऊ शकेल असा दिग्दर्शकही लागणार आहे. नेमक्या याच गोष्टी हिरोपंतीमध्ये मिसिंग आहेत. टायगर श्रॉफचा प्रॉब्लेम असा आहे की, त्याची चेहरेपट्टी खूपच नाजूक आहे आणि एखाद्या बॉडीबिल्डरला लाजवेल अशी त्याची फिजिक आहे. तो डान्स तर उत्तमच करतो, फायटिंगही सॉलीड करतो पण त्याचा योग्य तो वापर दिग्दर्शक सब्बीर खान करुच शकला नाहीये. एखाद्या वॉरियरसारखा फाईट्स करतो, इमोशनल सीन्समध्येही चांगला अभिनय करतो, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स उत्तम आहे. अगदी तसंच नवोदित क्रिती सनॉनबद्दल सांगता येईल. या दोघांचं फ्रेश इम्प्रेशन चांगलं आहे, पण कथेत घोळ झाल्यामुळे सिनेमाचाही घोळ झालेला आहे.

काय आहे स्टोरी ?

Heropanti

मुळात हिरोपंतीच्या स्टोरीमध्ये नवीन काहीच नाहीये. बबलू आणि डिंपीची ही लव्हस्टोरी आहे. डिंपी ही व्हिलन प्रकाशराजची मुलगी आहे. आता एवढं सांगितल्यावर स्टोरी काय असेल याचा तुम्ही सहज अंदाज बांधू शकता. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही न्यूकमर्सच्या स्कीलला पूर्ण न्याय मिळू शकला नाहीये, कथेमधूनही नाही आणि दिग्दर्शकाकडूनही नाही. जे काही चांगले सीन्स आहेत, बघण्यासारखे सीन्स आहेत, जबरदस्त सीन्स आहेत ते केवळ या टायगर आणि क्रिमीमुळेच आहेत हे कबूल करावंच लागेल.

परफॉर्मन्स

Aamir-Khan-Launch-First-Look-Of-Heropanti-Movie-90

अतिशय लोकप्रिय झालेली गाणी, अनेक वर्षांपासून लोकांच्या आठवणीत राहिलेली हिरोमधली शीळ एवढाच सिनेमा चालण्याच्या दृष्टीने पॉझिटीव्ह भाग आहे. टायगर श्रॉफच्या आधीसुद्धा अनेक बॉडीबिल्डर बॉलीवूडमध्ये आले आणि केवळ फिजिकच्या जोरावर ते हिट ठरले, अर्थात त्यांना वेगवान पटकथा, चटकदार संवाद आणि हुशार दिग्दर्शकाची साथ मिळाली होती. तशी साथ न मिळाल्यामुळे यापुढे टायगरला सोलो हिरो सिनेमे मिळतील का याबद्दल शंकाच आहे. क्रिती सनॉनचं स्क्रीन प्रेझेन्स उत्कृष्ट असल्यामुळे तिला चांगल्या सिनेमांची ऑफर मिळू शकेल पण टायगरची हिरोपंती पहिल्याच सिनेमात संपते की काय अशीच शक्यता आहे.

रेटिंग 100 पैकी 40

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close