ठरलं!, मोदींच्या शपथविधीला पाकचे पंतप्रधान येणार

May 24, 2014 12:46 PM0 commentsViews: 1390

modi_oath_pak
24 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार की, नाही यावरुन अखेर पडदा उठला आहे. अखेर पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ मोदींच्या शपथविधीला भारतात येणार आहेत. पीएमएल-एन या नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते तारिक अझीम यांनी याबद्दल दुजोरा दिला आहे. शरीफ यांच्यासोबत 4 ते 6 जणांचं शिष्टमंडळ भारतात येणार असून शपथविधीला हजर असणार आहे.

मोदी यांच्या शपथविधीनंतर शरीफ सोमवारीच पाकिस्तानला परतणार आहेत. शरीफ शपथविधीला येणार असल्याच्या बातमीला पाकिस्तानकडून आता औपचारिक होकार मिळाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. शरीफ यांच्या या निर्णयाचं भारत आणि पाकिस्तानातल्या राजकीय पक्षांनी स्वागत केलंय. गेल्या तीन दिवसांपासून शरीफ येणार की नाही यावरुन चर्चा सुरू होती. शरीफ येणार अशी दाट शक्यता होती पण त्यांच्या दौर्‍यावरुन शरीफ आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये तणाव निर्माण झाला होता.

लष्करानं शरीफ यांच्या भारत दौर्‍याला नकार दिला होता. शरीफ यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांनीही या दौर्‍याला विरोध केला होता. पण, शरीफ यांनी सर्वांचे सल्ले झुगारून मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहे. शरीफ या सोहळ्यासाठी भारतात आले तर भारतीय पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभाला हजर राहणारे ते पहिलेच पाकिस्तानी पंतप्रधान ठरतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close