‘आप’ला रामराम घ्यावा, शाझिया इल्मी सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत

May 24, 2014 12:08 PM0 commentsViews: 1259

43shazia_ilmi424 मे : लोकसभा निवडणुकीत ‘आप’टलेल्या आम आदमी पार्टीमध्ये आत बेबनाव निर्माण झाल्याचं चित्र समोर येतंय. एकीकडे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल अब्रुनुकसानीच्या खटल्यात तिहार जेलमध्ये आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या दिल्लीतील नेत्या शाझिया इल्मी आज ‘आप’ पक्ष सोडतील अशी सूत्रांची माहिती आहे.

शाझिया इल्मी आज पत्रकार परिषद घेणार आहे. पक्षामधल्या मतभेदांमुळे शाझिया सोडचिठ्ठी देत असल्याची चर्चा आहे. आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी शाझिया एक आहेत. शुक्रवारी शाजिया यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पक्षात काही बदल करावे अशी मागणी त्यांनी केली. या नाराजीमुळे शाझिया पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे.

आज दुपारी दोनच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन शाझिया यांची घोषणा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या वेळी जागावाटपावरुन शाजिया यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारला होता. आपने दिल्लीत सत्ता स्थापन करावी अशी शाझियांची इच्छा होती पण आपने ती नाकारली त्यामुळे शाजिया दुखावल्या गेल्या. एवढंच नाहीतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी शाझियांना दिल्लीतून लढायचं होतं पण त्यांना गाझियाबाद मतदारसंघ देण्यात आला आणि तिथे त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्या आणखी नाराज झाल्या. शाजिया पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडता याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close