…यांनी बोलावलं तर शपथविधीला जाईन !

May 24, 2014 12:47 PM0 commentsViews: 5159

56narendra modi jashodaben

24 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी येत्या सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधीला देशभरातून मान्यवर हजेरी लावणार आहे. पण दुसरीकडे मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आता आपलं मौन सोडलंय आणि जर मोदींनी आमंत्रण दिलं तर आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यास भाग्यशाली राहू अशी घरची मागणी जशोदाबेन यांनी केलीय.

आयबीएन नेटवर्क 18 शी खास बातचीत करताना जशोदाबेन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मोदींनी जर आपल्यासोबत राहण्यास बोलावले तर त्यांच्यासोबत राहण्यास तयार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. जशोदाबेन यांनी याअगोदर ही मोदी पंतप्रधान झाले तर ही गोष्ट अभिमान आणि गौरवाची राहील असं अभिमानाने सांगितलं होतं.

आताही जसोदाबेन मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. मोदी यांची पत्नी असणे हे माझ्यासाठी गर्व, अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत राहण्यास आपल्याला अडचण नाही असंही जशोदाबेन यांनी स्पष्ट केलं. तसंच आम्ही भलेही वेगवेगळे राहिलो पण आम्ही घटस्फोट घेतला नाही. मोदींनी जर शपथविधीसाठी बोलावलं तर आपण नक्की जाणार असंही त्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close