काँग्रेस नेते दुखात, निवडणुकीत आम्हाला बोलूच दिलं नाही !

May 24, 2014 10:26 AM0 commentsViews: 1234

33shashi_tharoor24 मे : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवामुळे काँग्रेसमध्ये अजूनही दुखवटा कायम आहे. पक्षाच्या व्यासपाठीवरुन बोलण्यास संधी मिळाली नाही, असं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलंय. राज्यातल्या नेत्यांना बोलायला संधी दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने नेता निवडीसाठी पुन्हा पूर्वीच्या इंदिरा गांधींच्या काळातल्या पद्धतीचा अवलंब करायला हवा, असं मतही थरुर यांनी मांडलंय. त्याचबरोबर नेता निवडीचा अधिकार राज्यातल्या नेत्यांना हवा असा सल्लाही थरुर यांनी दिला.

राहुल गांधींचा फारसा जनसंपर्क नाही – वाघेला

तर दुसरीकडे गुजरातचे काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला यांनी तर थेट राहुल गांधींवरच टीका केलीय. राहुल गांधींचा फारसा जनसंपर्क नाही असा घरचा अहेरच वाघेला यांनी दिला. सोनिया गांधी राहुल गांधीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. राहुल गांधींच्या सल्लागारांना दोष देण्याने काहीच साध्य होणार नाही, कारण राहुल गांधींनीच लोकांची निवड केलीय, अशीही टीका त्यांनी केलीय. प्रियांका गांधींवर राजकारणात येण्यासाठी कोणी जबरदस्ती करु शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close