मोदींच्या शपथविधीला सोनिया आणि राहुल गांधींही राहणार हजर

May 24, 2014 6:09 PM0 commentsViews: 1139

99099sonia_rahul24 मे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, मोदी विरुद्ध सोनिया गांधी असा खडा आखाडा पाहण्यास मिळाला. पण या आखाड्यात मोदींनी बाजी मारली. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणून आता काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेही मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहे.

 

आतापर्यंत गांधी परिवाराचे सदस्य उरस्थित राहणार की नाही याबद्दल सस्पेंस होता. पण तो आता दूर झालाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नरेंद्र मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. यूपीए सरकारला मोदींनी माँ-बेटे की सरकार, शहजादे अशा शेलक्या शब्दात टीका केली होती. तर राहुल, सोनियांनीही सडेतोड पलटवार केला होता.

 

या वाक्ययुद्धानंतह जनतेनं मात्र आपला कौल मोदी सरकारलाच दिला. एनडीएने सर्वाधिक 334 जागा जिंकून इतिहास रचला तर भाजपने 282 जागा जिंकून बहुमताचा आकडाही पार केला. आता नरेंद्र मोदी येत्या सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीला देशभरातील मान्यवर येणार आहे. पहिल्यांदाच शेजारील राष्ट्रातून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेही हजर राहणार आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याला वेगळं महत्वप्राप्त झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close