मेधाताईंही ‘आप’च्या कार्यपद्धतीवर नाराज

May 24, 2014 6:35 PM0 commentsViews: 1768

24 मे : लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालाय. खुद्द पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल निकालानंतर चार दिवस गायब झाले होते पण जेव्हा ते मीडियासमोर आले एक नवीन अटकेचा नवा ड्रामाच त्यांनी उभा केला. एकीकडे पराभवामुळे कार्यकर्ते खच्चून गेले असताना त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं सोडून केजरीवाल जेलमध्ये जाऊन बसले आहे यावर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्लीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच लोकसभेला सामोरं गेलो. जो पराभव झाला त्याबद्दल दुख:आहे. पण या पराभवामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ठिकठिकाणी चिंतन बैठक आयोजित केल्या पाहिजे. पराभवावर विचारमंथन झालं पाहिजे. यासाठी पक्षनेतृत्वाने पुढाकार घेणे गरजेचं आहे पण असं होतं नाहीय केजरीवाल जेलमध्ये जाऊन बसले आहे पक्षाची वाताहत झालीय असं सांगत मेधाताईंनी आपली नाराजी व्यक्त केली. जर वेळीच हे सावरलं नाहीतर पक्षाची मोठी हानी होईल असा सल्लाही त्यांनी दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close