सोनिया गांधी पुन्हा काँग्रेसच्या संसदीय पक्ष नेतेपदी

May 24, 2014 8:34 PM0 commentsViews: 822

Sonia Gandhi24 मे : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आज शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता सोनिया गांधींना विरोधी पक्षनेते पद मिळतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ नाहीय. त्यामुळे मोदींचं सरकार त्यांना हे पद बहाल करतं का, हे बघावं लागेल. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून सोनियांसमोर मोठं आव्हान असेल.

वेळप्रसंगी त्यांना तृणमूल काँग्रेस आणि अण्णाद्रमुक सारख्या काँग्रेसविरोधी पक्षांशीही जुळवून घ्यावं लागेल. या बैठकीमध्ये प्रियांका गांधींनी सक्रीय राजकारणात आणण्याची मागणीही करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close