आघाडीचं सूडबुद्धी राजकारण; गावांचं पाणी केलं बंद -भांडारी

May 24, 2014 9:14 PM0 commentsViews: 4176

345 bhandari24 मे : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. जिथं आघाडीला मतदान कमी झालं, तिथे पाणी आणि वीज बंद केली गेल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेत.

सातार्‍यात शहापुरी भागामध्ये 3 दिवस पाणीपुरवठा बंद आहे. तासगांव मतदार संघात 52 गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. तर कवठे-महांकाळच्या 20 गावात वीज नसल्याने पाणी योजना बंद असल्याचा आरोप माधव भांडारी यांनी केला आहे. हे सुडाचं राजकारण बंद करा असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ लिक झाला होता. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाहीतर गावचं पाणी बंद करू अशी धमकी दिली होती. याची आठवणही भांडारी यांनी करुन दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close