सेनेचे नेते आता शरीफ यांच्यासमोर शपथ घेणार का? -सातव

May 24, 2014 10:23 PM2 commentsViews: 3797

24 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेतेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. विशेष म्हणजे या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हजर राहणार आहे. शिवसेनेनं वेळोवेळी पाकचे कलाकार असो अथवा क्रिकेटला विरोध केला होता. याच मुद्यावर काँग्रेसचे विजयी उमेदवार राजीव सातव यांनी शिवसेनेची टिंगल उडवली आहे. सेनेचा पाकविरोध पाहता सेनेचे मंत्री आता नवाझ शरीफ यांच्यासमोर शपथ घेणार का ? सेना सत्तेसाठी शरीफ यांच्यासमोर शपथ घेणार का ? असा टोला सातव यांनी शिवसेनेला लगावला.तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नवाझ शरीफ यांच्या शपथविधीला हजर राहण्याच्या मुद्द्यावरून एका @zigzackly या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरच ट्विट रिट्विट केलंय. या ट्विटमध्ये “हे मजेशीर आहे. @zigzackly: नवाझ शरीफ येत आहेत? शिवसेना आता 25 ला रात्री राष्ट्रपती भवनाचं प्रांगण खोदणार का?” असा सवाल विचारण्यात आला. एका प्रकारे अब्दुल्ला यांनी याला समर्थन देत सेनेवर निशाणा साधलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rupesh

    tyachi kalje karu naka tumi.

  • Sham Dhumal

    नवाज शरीफ्ना आमंत्रण दिले म्हणजे पाकिस्तानच्या अटी मान्य केल्या असा अर्थ होत नाही.
    जाती-धर्माचे (वाद लावून) राजकारण करून कॉंन्ग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. ब्रिटीश नीतीचा उपयोग केला. उध्दव ठाकरेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.

close