मोदींचा आंब्यांवरही करिश्मा, आंब्याच्या नव्या जातीला दिलं ‘नमो’चं नाव

May 25, 2014 6:01 PM0 commentsViews: 970

25 मे : नरेंद्र मोदींचा उद्या शपथविधी होणार आहे. साध्या मोदींच्या व्यक्तिमत्वाचा, नावाचा प्रभाव अनेक वस्तूंवरही दिसतं आहे. पण उत्तर प्रदेशात मात्र आंब्याच्या एका जातीचं नामकरणही ‘नमो’ आंबा असं केलं गेलं आहे. उत्तर प्रदेशातल्या मलिहाबादच्या एका आंबा उत्पादकाने आंब्याच्या एका जातीचं नमो आंबा असं नामकरण केलं आहे.

लखनौच्या दशेरी आंब्यासारखा गोड आणि मुर्शिदाबादच्या हुसनारा आंब्यासारखा टणक, ही या आंब्याच्या नव्या जातीची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील. फळांचे प्रसिद्ध उत्पादक हाजी कलिम उल्ला खान यांनी हे कलम तयार केलं आहे. पुढच्या 15 दिवसांमध्ये ही फळं तयार होती. या आंब्याच्या नव्या जातीला त्यांनी नमो आंबा असं नाव दिलं आहे. कारण या आंब्यांमध्ये मोदींचे गुणधर्म असल्याचं हाजीसाहेब सांगतात.

हाजी कलिम उल्ला खान यांच्या कार्याचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी या 100 वर्ष जुन्या झाडाची जोपासना केलीे आहे आणि या झाडाला दर वर्षी 300 जातीचे आंबे येतात. ‘नमो’ आंब्याचं झाड मात्र नवीन आहे. या झाडाला फक्त 20 आंबे लागलेत. 73 वर्षांच्या हाजी खान यांचे काही विशेष बेतही आहेत.

हाजीसाहेबांच्या अब्दुल्ला नर्सरीमध्ये आंब्यांच्या इतरही जाती आहेत. ऐश्वर्या आणि सचिनच्या नावाचे आंबेही चांगले बहरले आहेत. पण अखिलेश यादव यांच्या नावाचा आंबा मात्र कोमेजलेलं दिसतं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close