सेनेचा ‘समझोता’, शरीफ यांच्या साक्षीने घेणार शपथ !

May 25, 2014 7:29 PM1 commentViews: 2132

Uddhav-650

25 मे :  भारताचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी उद्या शपथ घेणार आहेत. त्यावेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेनेतला तिढा आता सुटला आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सगळे नवे खासदार उपस्थित राहणार आहेत. एवढचं नाही तर उद्या होणार्‍या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत शिवसेनेच्या एका खासदाराचा समावेश असेल अशी सूत्रांची माहिती आहे.

मोदींच्या शपथविधीला जगभरातील आठ देशप्रमुखांसह तीन हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोदींनी नवाज शरीफ यांना दिलेले आमंत्रण स्वीकारत ते भारत भेटीवर येत आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.

एकीकडे पाकिस्तानशी चर्चाच नको , अशी शिवसेनेची भूमिका आहे. तर आता दुसरीकडे शिवसेनेचे खासदार उद्या शरीफ यांच्यासमोरच उपस्थित राहणार आहेत.

  • observer

    #Shivsene che Dakhavneche daat vegle ani khanyache daat vegle jale ahet..Jar Balasaheb aste tr he hou dile naste…

close