मुंबईत सचिनच्याच हस्ते झालं त्याच्या पुतळ्याचं अनावरण

April 13, 2009 3:10 PM0 commentsViews: 2

13 एप्रिल, मुंबई लंडनमधील मादाम तुसाँच्या संग्रहालयात झळकणार्‍या सचिनच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण आज स्वतः सचिननं केलं. यानिम्मितानं सचिन सचिनच्याचं भेटीला येण्याचा हा दुर्मीळ योग क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला. हुबेहुब सचिनसारखीच दिसणारी ही प्रतिमा पाहून स्वतः सचिनही चकित झाला होता. सेंच्युरी साजरी केल्यानंतर बॅट उंचावून आनंद साजरा करणार्‍या सचिनची ही मेणाची प्रतिमा मादाम तुसॉच्या संग्रहालयात सचिनच्या वाढदिवशी येत्या 24 एप्रिलला झळकणार आहे. आपल्याला वाढदिवसाची मिळालेली ही सुंदर गिफ्ट असल्याचं सचिननं म्हटलं आहे.

close