आम्हाला दुधात मिठाचा खडा नाही टाकायचा -संजय राऊत

May 26, 2014 11:29 AM1 commentViews: 2654

26 मे : नरेंद्र मोदींच्या शपथविधी आधी शिवसेनेनं आपली भूमिका मवाळ केली आहे. या आनंदाला कुणाची नजर लागू नये. आम्हाला दुधात मिठाचा खडा नाही टाकायचा. मोदींनी शांततेसाठी एक पाऊल पुढे टाकलं असेल तर नवाझ शरीफ यांना एक संधी द्यायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत सहकुटुंब दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य तसंच तेजसही आहेत. आजपर्यंत शिवसेनेनं पाकचे कलाकार असो अथवा क्रिकेट मॅच प्रत्येक गोष्टीला सेनेनं कडाडून विरोध केला. मात्र आज एनडीए सरकार सत्ते आलंय. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हजर असणार आहे. त्यामुळे सेनेचे नेते आता शरीफ यांच्यासमोर शपथ घेणार का ? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. या वादावर सेनेनं ‘समझोता’ करत दिल्लीत दाखल झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • niranjan chavan

    बाळा साहेब आज तुमची उणीव जाणवते
    आज तुमचे शिवसैनिक पाक समोर नतमस्तक होणार
    त्याला दम भरायला वक्त्या आज नसल्याची खंत वाटते बाळा साहेब आज तुम्ही हवे होते….

close