‘लाडू घ्या..’, भाजप कार्यकर्त्यांचा फूल टू जल्लोष

May 26, 2014 4:53 PM0 commentsViews: 589

26 मे : नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केलीय. कुठे लाडूचं वाटप होत आहे तर कुठे फटाके फोडण्यासाठी सज्ज झाले आहे. नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी द्वारका परिसरात जल्लोषाची तयारी केलीय. बुंदीच्या लाडूचं वाटपही यावेळी करण्यात येणार आहे. तर कणकवलीतही आनंद साजरा केला जातोय, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कणकवली शहर आणि मुंबई गोवा महामार्गावर भाजपच्या प्रत्येक खासदारासाठी एक अशा 282 गुढ्या उभारल्या आहेत. सुमारे दोन हजारांहून जास्त भाजप कार्यकर्त्यांची मोटारसायकल रॅली ही कणकवलीतून निघणार आहे. तसंच शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या सिक्रन वर दाखवण्यात येणार आहे. तर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आज भाजप कार्यकर्त्यांनी ठाणेकरांना शेकडे किलो लाडू वाटले. भाजपचे नेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर 50 किलो बुंदी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

close