प्रिया दत्तच्या कॅम्पेनसाठी दिलीप कुमार यांचा पाठिंबा

April 13, 2009 3:31 PM0 commentsViews: 7

13 एप्रिलप्रिया दत्तला मतदानाच्या कॅम्पेनमध्ये मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तचा पाठिंबा मिळत नसला तरी दिलीप कुमार यांनी मात्र मुंबईमध्ये हजेरी लावली. काँग्रेसने नवीन ऑफिस सुरू केलं याप्रसंगी दिलीप कुमार आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रिया दत्तनं जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलीप कुमार यांनी यावेळी प्रिया दत्तला आशीर्वाद दिले. तेव्हा जुन्या आठवणींनी प्रिया दत्त भारावून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की, 'जेव्हा माझे वडील नवीन ऑफिस सुरू करायचे तेव्हा दिलीप कुमार यायचे म्हणून आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे'. भाऊ संजय दत्तही आपल्यासाठी प्रचार करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

close