लतादीदी शपथविधीला नाहीत, मोदींना गणेशमूर्ती पाठवली

May 26, 2014 5:39 PM0 commentsViews: 2566

456456latadidi
26 मे : भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर प्रकृती ठीक नसल्यामुळे शपथविधीसाठी हजर राहू शकल्या नाही. लतादीदींनी मोदींना पत्र लिहून दु:ख व्यक्त केलंय. पुण्यात दीनानाथ हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदी हजर होते. यावेळी लतादीदींनी मोदी हे आपल्या भावासारखे आहे आणि ते पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण आज नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली पण यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे लतातदीदी शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. लतादीदींनी मोदींना पत्र लिहून आपण हजर राहू शकलो नाही याबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसंच लतादीदींनी मोदींना शुभकार्यासाठी गणेशमूर्ती भेट म्हणून दिली. तर दुसरीकडे बॉलिवूडचा शहेनशाह अमितभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांतही शपथविधीला गैरहजर राहिले. बिग बी आणि रजनीकांत यांना आमंत्रण देण्यातही आले होते.

लतादीदींचं पत्र

आदरणीय , नरेंद्रभाई
तुमचं निमंत्रण मिळालं पण प्रकृती अस्वास्थामुळे मी उपस्थित राहू शकत नाही. माझी आशा आहे की, तुम्ही माझी अडचण समजून घ्याल.
संपूर्ण देशानं आपले जे स्वागत केलं आहे ते अवर्णनीय आहे. आपल्या मातृभूमीची धुरा देशान आपल्या हातात सोपवली आहे. आजचा दिवस संपूर्ण देशासाठी आनंदोत्सवाचा आहे. या मंगल समयी मी तुम्हाला गणेशमूर्ती भेट पाठवत आहे. तुमचे खूप अभिनंदन
वंदेमातरम्

तुमची नम्र
लता मंगेशकर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close