पाकिस्तानच्या स्वात प्रांतात शरियत कायदा लागू

April 14, 2009 6:56 AM0 commentsViews: 2

14 एप्रिल पाकिस्तानच्या स्वात प्रांतात मुस्लीम शरियत कायदा लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी यासंदर्भातल्या वादग्रस्त करारावर सही केलीय. त्यामुळे स्वात प्रांतात आता तालिबानी शक्तींचं आणि धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचं वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. मार्चमधे उद्भवलेल्या अराजक परिस्थितीवर मात करण्यासाठी पाक संसदेने तालिबानी गटांसोबत शांतता करार केला होता. त्यातल्या तरतुदीनुसार आता स्वात प्रांतात शरियत मुस्लीम कायदा लागू करण्यात आलाय. अमेरिका, इंग्लंडसह भारतानेही पाकिस्तानी सरकारच्या या भूमिकेवर चिंता व्यक्त केली होती. या निर्णयामुळे तालिबानी शक्ती पाकिस्तानातल्या इतर प्रांतांकडे आपला मोर्चा वळवतील, ही भीतीही खरीही ठरतेय. गेल्या आठवड्यात तालिबान्यांनी इस्लामाबादपासून अवघ्या 100 किलोमीटरवर असलेलं बुनेर खोरं काबीज केलं. शरियत मुस्लीम कायदा करारावर पाकनं सही केल्यानं पाकिस्तान तालिबान्यांपुढे झुकलंय, अशी चर्चा सुरू आहे.

close