खाते वाटप जाहीर, राजनाथांकडे गृह तर जेटलींकडे अर्थ खाते !

May 27, 2014 7:15 PM0 commentsViews: 8876

df56team_modi27 मे : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखाते सोपवण्यात आले आहेत. त्यांच्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात दुसर्‍या नंबरवर बाजी मारली आहे ती अरुण जेटली यांनी. अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण, अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स खातं सोपवण्यात आलंय.

तर सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खातं देण्यात आलंय. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींकडे दळणवळण खातं आणि गोपीनाथ मुंडेंकडे ग्रामविकास खातं सोपवण्यात आलंय. सदानंद गौड यांना रेल्वेमंत्री पद देण्यात आलंय.

तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खातं देण्यात आलंय. मोदींच्या मर्जीतल्या समजल्या जाणार्‍या स्मृती इराणी यांच्या गळ्यात मनुष्यबळ विकासमंत्रीची माळ पडलीय. तर मनेका गांधी यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खातं सोपवण्यात आलंय तर दुसरीकडे लोकसभेत मोदी लाटेची चाहूल लागलेले रामविलास पासवान भाजपमध्ये दाखल झाले. आता त्याचा त्यांना पुरेपूर फायदा झालाय. रामविलास पासवान यांच्यागळ्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाची माळ पडलीय.

ही मोदी टीम

 • - राजनाथ सिंह – गृहमंत्री
 • - अरुण जेटली – अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री
 • - सुषमा स्वराज – परराष्ट्र खातं
 • - नितीन गडकरी – दळणवळण आणि जहाजबांधणी मंत्री
 • - सदानंद गौडा – रेल्वमंत्री
 • - रविशंकर प्रसाद – कायदेमंत्री आणि दूरसंचारमंत्री
 • - प्रकाश जावडेकर – माहिती आणि प्रसारण
 • - राधा मोहन सिंग – कृषी खातं
 • - गोपीनाथ मुंडे – ग्रामविकास
 • - जुआल ओराम – आदिवासी कल्याण मंत्री
 • - उमा भारती – जलसंपदा आणि गंगा स्वच्छता
 • - नजमा हेपतुल्ला – अल्पसंख्यांक कल्याण
 • - रामविलास पासवान – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
 • - व्यंकय्या नायडू – नागरी विकास आणि संसदीय कामकाज
 • - मनेका गांधी – महिला आणि बालकल्याण
 • - स्मृती इराणी – मनुष्यबळ विकासमंत्री
 • - डॉ. हर्ष वर्धन – आरोग्य
 • - अनंत कुमार – रसायन आणि खत
 • - कलराज मिश्र – लघु आणि मध्यम उद्योदमंत्री
 • - अशोक गजापती राजू – नागरी उड्डाण मंत्रिपद

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close