…आणि बिबट्या झाडावरुन खाली उतरला

May 27, 2014 8:20 AM0 commentsViews: 1983

27 मे : सिंधुदुर्ग तळवडे गावात एका बिबट्याने धुमाकूळ घातला. हा बिबट्याा वस्तीत घुसल्यामुळे एकच धावपळ उडाली. लोकांनी या बिबट्याला पळवून लावण्यासाठी आरडाओरड केली पण हा बिबट्या जवळच असलेल्या एका 100 फूट उंच झाडावर चढून बसाला. बिबट्याला खाली आणण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न अपूरे पडल्यानंतर लोकांनी झाड हलवून त्याला खाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले, पण त्यालाही हा बिबट्या दाद देत नसल्याचे पाहून एका धाडसी गावकर्‍यानं झाडावर चढून फांदी तोडण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने हल्ला केला. त्यात हा धाडसी गावकरी झाडावरुन खाली पडून जखमी झाला. थोड्यावेळ्याने बिबट्या शेवटी झाडावरुन खाली येऊन जंगलात पसार झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close