उद्धव ठाकरे मराठी नाहीत – आर.आर.पाटील

April 14, 2009 8:03 AM0 commentsViews: 3

14 एप्रिल, दिंडोरी उद्धव ठाकरेच मराठी म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत, असा टोला आर. आर. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरहरी झोरवाळ यांच्या प्रचारासाठी आर.आर. पाटील नाशिकमध्ये नांदगावत आले होते. त्यावेळी घेतलेल्या सभेत आर. आर. पाटील यांनी ही टीका केली. एकही मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या लायकीचा नाही, या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी दिंडोरीत चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी नुसता उद्धव यांचा समाचारच घेतला नाही तर त्यांच्यावर चांगली खरपूस टीकाही केली. या वक्तव्यांमुळे राज्यातल्या 10 कोटी जनतेचा अपमान त्यांनी केलाय, असंही ते म्हणालेत.

close