आश्रमशाळेत चिमुरड्यांना ब्लू फिल्म्स दाखवून लैंगिक अत्याचार

May 27, 2014 1:56 PM0 commentsViews: 7722

3333raigad_ashram27 मे : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधल्या चंद्रप्रभा ट्रस्टच्या आश्रमशाळेत चिमुरड्यांचा लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी आश्रमाचे संचालक अजित दाभोळकर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या ट्रस्टचे संचालक अजित दाभोळकर आणि तिथं मुलांचा सांभाळ करणार्‍या मावशी त्यांचे लैंगिक शोषण करायच्या असा आरोप इथं शिकणार्‍या मुला-मुलींनी केला आहे.

अजित दाभोळकर लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. या लहान मुलांना अश्लील चाळे करण्यासाठीही भाग पाडलं जायचं, लहान मुलांना जबरदस्तीने एकमेकांशी संबंध ठेवायला लावलं जायचं, ब्लू फिल्म्स दाखवल्या जायच्या आणि याबद्दल कुणालाही सांगू नका म्हणून धमकवलंही जायचं.

कर्जत तालुक्यातल्या टाकवे गावात चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टची आश्रमशाळा आहे. या शाळेत अनाथ, गरजू, निराशि्रत मुला-मुलींची शिक्षणाची आणि निवासाची सोय केली जाते. कर्जातच्या आश्रमात एकूण 32 मुलं- मुली शिक्षण घेतात. सध्या मे महिन्याची सुट्टी लागल्यानं बहुतांश मुलं घरी गेलेली आहेत. आश्रमशाळेत फक्त दोन मुलं राहिलेली होती. त्यापैकी एका मुलाचे पालक त्याला न्यायला आले होते, मात्र त्याला सुट्टीला न पाठवता जबरदस्ती करुन आश्रमातच ठेवून घेण्यात आलं.

अखेर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर चिमुरड्याची सुटका करण्यात आली आणि मुलाला त्याच्या आईकडे सोपवण्यत आलं. चिमुरड्याने सांगितलेल्या भयानक अनुभवानं आई आश्चर्यचकित झाली आणि त्यांनी सदर प्रकाराची तक्रार रायगडच्या चाईल्डलाईन या संस्थेकडे केली. याच चाईल्डलाईनच्या पुण्याच्या संचालक डॉ.अनुराधा सहस्रबुद्धे यांना सदर भयंकर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कर्जत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आणि संस्थेतल्या दुसर्‍या पीडित मुलीची सुटकाही केली.

मुलांनी सांगितलेले लैंगिक शोषणाचे प्रकार अंगावर शहारे आणणारे आहेत. मुलांच्या म्हणण्यानुसार या ट्रस्टचे संचालक अजित दाभोळकर आणि तिथं मुलांचा सांभाळ करणार्‍या मावशी त्यांचे लैंगिक शोषण करायच्या. लहानग्यांना अश्लील चाळे करायला भाग पाडलं जायचं, ब्ल्यू फिल्म दाखवल्या जायच्या, लहान मुलांना जबरदस्तीने संबंध ठेवायला भाग पाडलं जायचं. न ऐकणार्‍या मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जायचा.

या सर्व विकृत प्रकाराचे छायाचित्रणही केलं जायचं आणि लहानग्यांना कुणालाही सांगू नकात अशा शब्दांत धमकावलं जायचं. दरम्यान, आश्रमाचे संचालक अजित दाभोळकर यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दाभोळकर ायंनी आश्रमात लैंगिक शोषण होत असल्याच्या आरोपांचा साफ इन्कार केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close