स्कॉर्पिओच वापरा, ‘महिंद्रा अँण्ड महिंद्रा’चं मोदींना साकडं !

May 27, 2014 6:08 PM0 commentsViews: 25114

27 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी स्कॉर्पिओ गाडी वापरावी, अशी विनंती कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी केली आहे. अत्यंत सुरक्षित असलेल्या आणि एसपीजीच्या सुरक्षा मानकांनुसार स्कॉर्पिओमध्येही बदल करून देऊ असं महिंद्र यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदींना याबाबत विनंती करणारं पत्र त्यांनी लिहिलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी स्कॉर्पिओ गाडीच वापरायचे. एव्हाना पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी मोदी स्कॉर्पिओ गाडीनेच आले. पण आज सकाळी मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पंतप्रधान कार्यालयात येताना ते बीएमडब्ल्यू गाडीने आले. एसपीजीच्या नियमांनुसार भारताच्या पंतप्रधानांना बीएमडब्ल्यू 7 सीरीजची विशेष गाडी दिली जाते. ही गाडी भारत सरकारने बीएमडब्ल्यू कंपनीकडून खास बनवून घेतली आहे. अशा सहा ते सात गाड्या एसपीजीकडे आहेत आणि एका गाडीची किंमत सहा ते सात कोटी एवढी आहे असं बोललं जातं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close