जम्मू काश्मीरमध्ये मिग-21 कोसळलं, 1 ठार

May 27, 2014 6:22 PM0 commentsViews: 403

00mig21

 27 मे : हवाई दलाचं मिग-21 ला पुन्हा अपघात झालाय. मिग-21 हे लढाऊ विमान जम्मू आणि काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये कोसळलं. या विमान अपघातात पायलटचा मृत्यू झालाय तर को-पायलट जखमी झाला. प्रशिक्षणादरम्यान हे विमान आज सकाळी कोसळलं. विमानाच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मिग विमानांना यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे यांना उडत्या शवपेट्या अशी टीकाही झालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close