‘फस्ट डे फस्ट शो’, कलम 370 रद्द करणार?

May 27, 2014 6:54 PM3 commentsViews: 14122

art37027 मे : मोदी सरकार स्थापन होऊन काही तास उलटले नाही तेच टीम मोदीने वादाला तोंड फोडलं आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याची संकेत आता मिळत आहे. कलम 370 मुळे आतापर्यंत बरंच नुकसान केलं असून याविषयी काश्मिरी तरूणांशी बोलणं गरजेचं असल्याचं वादग्रस्त विधान पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलंय.

 

कलम 370 रद्द करण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत जितेंद्र सिंग यांनी दिले आहेत. कलम 370 नं आधीच बरंच नुकसान केलंय. काश्मीरचे तरुणही त्यामुळे चिंतेत आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 बाबत चर्चा करायचं ठरवलं आहे. त्यावर चर्चा करण्याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही आमच्या आश्वासनापासून भरकटलो आहोत.

 

याचा अर्थ फक्त असा होतो की, जे याबाबत तयार नाहीत त्यांची मनं वळवणं. आम्ही याबाबत लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे.काश्मीरच्या लोकांना विशेषत: तरुणांना आमची मतं पटत आहेत. कलम 370 ही तात्पुरती तरतूद असल्याचं पंडित नेहरुंनी संसदेत म्हटल्याचा दाखला देत आता या कलमाची गरज नसल्याचं जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. मात्र जितेंद्र सिंग यांच्या विधानमुळे नवा वाद पेटला आहे.

काय आहे कलम 370 ?

– या कलमानुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा
– पण ही फक्त तात्पुरती तरतूद आहे
– जम्मू-काश्मीरातल्या लोकांसाठी काही विशेष कायदे
– नागरिकत्व, संपत्तीची मालकी याविषयीचे स्वतंत्र कायदे
– त्यांचे मूलभूत हक्कही इतर भारतीयांपेक्षा वेगळे
– केंद्रानं मंजूर केलेले कायदे लागू करण्यापूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभेची मंजुरी आवश्यक
– घटनेचा XXI भागानुसार जम्मू आणि काश्मिरला विशेषाधिकार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Gopal Kale

  कलम 370 मुळे फक्त नाम मात्र कश्मीर हा भारताचा भाग आहे सर्व अधिकार हे कश्मीर विधानसभेकडे.एक वेळ अशी येईल की कश्मीर सरकार स्वत : ला पाकिस्तान मध्ये सामील करायला मागे पुढे पाहणार नाही .तिथे आपल्या जवानांवर वारंवार हल्ले होतात याचे कारण काय ? यामध्ये
  तिथली जनता नाहीतर कुणीतरी सामील आहे

  • Deepak holey

   As india is one nation we have to treat every state equally so we need to equalise all status

 • Onkar

  khupach chhaan…!!!1

close