सेनेचे नाराजीनाट्य संपले,अखेर अनंत गीतेंनी पदभार स्वीकारला

May 28, 2014 2:55 PM12 commentsViews: 32630

12313anant gite28 मे : अखेर शिवसेनेला डोईजड झालेलं अवजड खातं हलक करुन घ्यावं लागलं आहे. शिवसेनेची नाराजी दूर झालीय आणि अनंत गीते यांनी अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला आहेत.

आज सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेची नाराजी दूर झाली. यानंतर गीतेंना ‘मातोश्री’वरुन फोन आला आणि पदभार स्वीकारा असं सांगण्यात आलं.

शिवसेनेला आणखी एक खातं मिळण्याची शक्यता आहे. पण यावर एक-दोन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. खातेवाटपात शिवसेनेकडे अवजड उद्योग खातं आलं. त्यावर उद्धव ठाकरे नाराज झाले आणि या खात्याचा पदभार स्वीकारायचा की नाही, यावर सेनेत चर्चा चालली होती अखेर यावर पडदा पडला.

 ‘डिपार्टमेंट बुरा है. तो उसे अच्छा किजीए’ , मोदींनी सुनावले

पण खाते मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे बरंच काही घडलं. 26 मे रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांना चहापानासाठी बोलवलं, तेव्हा त्यांनी प्रत्येकाला कोणतं खातं मिळणार याची कल्पना दिली होती. आपल्याला अवजड उद्योग खातं मिळतंय हे गीतेंनी उद्धवना सांगितलं नाही. गीतेंनी असं का केलं हा मोठा प्रश्नच आहे. शपथविधीच्या रात्री जेव्हा उद्धवना या खात्याबाबत कळलं, तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर गीतेंची दिल्लीत धावाधाव सुरू झाली. गीते भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटले. पण याबाबत निर्णय मोदी घेणार होते.

दुसर्‍या दिवशी सार्क नेत्यांबरोबर मोदींच्या बैठका होत्या. त्याच्या तयारीत मोदी व्यस्त होते. मंगळवारी संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीनंतर गीते मोदींना म्हणाले की ‘ये डिपार्टमेंट बुरा है’ त्यावर मोदींनी उत्तर दिलं, ‘तो अच्छा किजीए उसे’ !, मोदींनी असं उत्तर दिल्यावर गीतेंनी मीडियाशी बोलण्यास सुरुवात केली आणि भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी मोदी आणि उद्धव यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव यांची नाराजी दूर झाली आणि गीतेंना मातोश्रीवरुन फोन आला आणि त्यांना पदभार स्वीकारा असं सांगण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Prathamesh Tendulkar

  ’डिपार्टमेंट बुरा है, तो उसे अच्छा किजीए’ , मोदींनी गीतेंना सुनावले…. मोदी नावाच्या सिंहाने शिवसेनेच्या वघांच्या डरकाळिला silencer लावला आहे …

 • Praful

  I agree with Modi view. When something is bad specially in any dept then chances are more to shine their because any one have better opportunity to prove their ability by making that dept well work. Anant Gite should feel fortunate that he got sit in Cabinet because getting chance to work with Modi is big chance then any dept.

 • Pradipvasant Pawar

  khate changle nahi hyacha vegla sanket matdaranmadhye gela asata, bare zale padbhar swikala!

 • rahulil.com

  bura hai mhanje yat paise nahi asa aahe kay?

 • Prashant Kalkute

  hich wel aahe kartutwa dakhwaychi,nusatya darkalya fodun vikas hot nasto…vikas karnyasathi sayam aani efforts lagtat te waghani dakhwawet aata tari pardarshi karbhar karun dakhawa naitar yashachya dhundit 5 year nighun jayche…we expect lot from sena

 • Tejas Rane

  Bjp la bahumat asunahi sena asa natak ka karte. Bjp madhylach kahi jyeshta netyanna mantripad milale nhi, tumhala mantripad milale tari khush nhi.wah re wah. je bhetatay tyachayt tari samadhan ghya. :P

  • Manoj Biwalkar

   Tejas rane miltay mhanje bjp upkar nahi karat khat deun senela senechya karykartyani modi kai ahet ani tyancha agenda kai ahe he talagala paryant pohchavlay ani tyamule he yash milal ahe to senecha hakka ahe.
   ani kahi thikani bjp che candidates he sene mulech nivdun alet example. Bhiwandi ki jithe bjp 20%ani sena 80% ahe tithe sena nasti tar bjp cha candidates kapil patial vijayi zale naste ase khup matdar sangh ahet.

   • amit

    Manoj Dont Be blind Supporter . Modi factor mule tumache seats aale aani tyasathi talala jayachi garaj nahi karyakarte pohachayacha aadich lokana mahiti hota vote kunala dyayacha hya weles. karyakartyani evadach sangitala . modina niwadun anayacha tar maacha manasala vote dya .. BJP cha haath aahe pan evada pan nahi ki satta aali mhanun bhetala tari magruri karayachi.

   • Saharsh Atkekar

    You’re getting it all wrong.

    हक्क नाही आहे.. शिवसेना महाराष्ट्र मर्यादित पक्ष आहे, त्यांनी विधानसभा एलेक्षन्स वर कॉन्सेंट्रेट करावा.

    महाराष्ट्रा सुधारण्या साठी प्रयत्न करावा आणि नवीन योजना तयार करावा.

    Central ministry is a different ball game all together.

    N tyanni lakshat thevla pahije ki BJP 272+ ahet. NDA is an alliance, not a compulsion.

    The ministry is deployed as per the caliber, not legacy or dynasty.

    विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा

 • charudata

  It is proved once again that no one will be entertained more….

 • Maneesh Billari Patil

  पैसा नहीं क्या उसमे

 • omkar soman

  jar nusti changli mantripade milayla havi yasathi jar praytn karta tar mag changli kam karayla shika adhi…….

close