‘स…’सचिनचा, विद्यार्थ्यांना पुस्तकात धडे

May 28, 2014 12:37 PM0 commentsViews: 510

we5sachin_book28 मे : भारतरत्न, विक्रमादित्य, किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याच्या दैदीप्यमान कामगिरीचा धडा आता विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या चौथीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरच्या यशस्वी कामगिरीचा कोलाजच्या माध्यमातून चित्रमय आढावा घेण्यात आला आहे.

 

चौथीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये हे कोलाज असणार आहे. यामध्ये त्याने बजावलेली कामगिरी, पटकावलेले पुरस्कार आणि शेवटच्या सामन्यातील त्याचे भाषण याची माहिती देण्यात आली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close