युतीमध्ये नाही पण आघाडीमध्ये बिघाड – गोपीनाथ मुंडे

April 14, 2009 8:07 AM0 commentsViews: 4

14 एप्रिल युतीत बिघाड नाही पण आघाडीत आहे, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या मॅरेथॉन प्रचार दौ-यात आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलीये.आपल्या मॅरथॉन प्रचार दौर्‍यानं अवघा महाराष्ट्र ढवळून काढणारे भाजप नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. मात्र यंदा भाजपनंच मुंडेंना जरा जखडूनच टाकलंय. पण तरीही मुंडेचा झंझावात कायम आहे. प्रचाराचा पहिला टप्पा संपत असतानाच, IBN – 7 चे मुंबई ब्युरो चीफ रवींद्र आंबेकर यांनी गोपीनाथ मुंडेंशी प्रचार दौर्‍या दरम्यानच बातचीत केली. गोपीनाथ मुंडे यांच्याशी केलेली बातचीत व्हिडिओवर पाहता येईल.

close