…तोपर्यंत हाफीज सईदला भारताच्या ताब्यात देणार नाही -शरीफ

May 28, 2014 4:10 PM0 commentsViews: 21275

6456modi_sarif28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीदरम्यानचा नवा खुलासा आता समोर आला आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड हाफीज सईदला भारताच्या ताब्यात स्वाधीन करता येणार नाही असं शरीफ यांनी मोदींना सांगितलं.

26/11 च्या प्रकरणीची पाक कोर्टात सुनावणी सुरू आहे. भारताने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय निघावा असी अपेक्षा शरीफ यांच्या व्यक्त केलीय. पण सईद हा कोर्टात दोषी सिद्ध झाल्याशिवाय त्याला भारताच्या स्वाधीन करता येणार नाही, असंही शरीफ यांनी मोदींना सांगितल्याचं शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितलं.

तसंच या भेटीत काश्मीर मुद्द्याचाही विषय निघाला अशी माहितीही अझीझ यांनी दिली. पण, भारत भेटीवर असलेल्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळानं हुरियतच्या नेत्यांची भेट घेतली नाही, असंही त्यांनी सांगितलं. दहशतवाद हा मुद्दा दोन्ही देशांसाठी काळजीचा आहे आणि त्याविरोधात लढा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं पाकिस्ताननं मोदींना सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close