पवार पंतप्रधान व्हावेसे वाटण्यात गैर काय ? – सूर्यकांता पाटील

April 14, 2009 8:09 AM0 commentsViews: 42

14 एप्रिल शरद पवार या आमच्या नेत्यानं पंतप्रधान व्हावं,अशी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यात चुकीचं असं काय, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी ' आयबीएन लोकमत 'ला दिलेल्या खास मुलाखतीत विचारला आहे. शरद पवार यांच्यावर दबाव आणून त्यांना बदलवता येणार नाही. मात्र त्यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचाही आरोपही सूर्यकांता पाटील यांनी केलाये. सूर्यकांता पाटील यांची मुलाखत ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close