नितीन आगे हत्या : अखेर ‘खर्डा संसद’ भरलीच !

May 28, 2014 6:10 PM0 commentsViews: 3077

kharad_sansad28 मे : नितीन आगे या दलित तरुणाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदगनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात ‘खर्डा संसद’ अखेर भरलीच. नितीन आगेच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुण्यातून पदयात्रा काढली होती.

खडर्‌यामध्ये सभा घेऊन या पदयात्रेचा समारोप झाला. ‘खर्डा संसद’ असं या सभेचं नाव आहे. पण, जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळे तुम्हाला तिथे सभा घेता येणार नाही, असं सांगत मंगळवारी पोलिसांनी या संसदेला परवानगी नाकारली होती.

परवानगी नसली तरी संसद घेणारच यावर या संघटना ठाम होत्या आणि त्यानुसार ही संसद भरली. मृत नितीन याचे कुटुंबीयही व्यासपीठावर आहेत. कम्युनिस्ट नेत्या वृंदा करातही या संसदेसाठी उपस्थित आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close