INS विक्रांत निघाली अखेरच्या ‘प्रवासा’कडे !

May 28, 2014 7:04 PM0 commentsViews: 2486

28 मे : ऐतिहासिक युद्धनौका आयएनएस विक्रांत आपल्या अखेरच्या प्रवासाकडे निघाली आहे. आयबी कॉर्पोरेशनने आयएनएस विक्रांतला दारुखाना डॉकमध्ये हलवलं आहे. दारुखाना डॉकमध्ये जहाज तोडणी केली जाते. आयबी कॉर्पोरेशनने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धक्का न पोहोचवता विक्रांत नेव्हल डॉकमधून हलवण्याची परवानगी मिळवली आहे.

मात्र शिवसेनेनं याला कडाडून विरोध केला आहे. नेव्हल डॉकयार्डसमोर शिवसेनेनं आज बुधवारी ठिय्या आंदोलन केलं. सेनेचे नवनिर्वाचित खासदार राहुल शेवाळे आणि  अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सेनेच्या आंदोलनाची दखल घेऊन नौदलांच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र विक्रांत वाचलीच पाहिजे अशी भूमिका सेना नेत्यांनी घेतली.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी विक्रांतला टग बोटीच्या साहाय्याने नेव्हल डॉक येथून मुंबईतल्या दारुखाना इथं हलवलं आहे. सुप्रीम कोर्टाने विक्रांत या युद्धनौकेला आहे त्या स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत परंतू विक्रांतला आयबीने 60 कोटी रुपयांनी लिलावात विकत घेतलं होतं. आयबीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धक्का न पोहचावता विक्रांत ज्या नेव्हल डॉकमध्ये आहे त्या ठिकाणाहून अन्यत्र नेण्याची परवानगी मिळवलीय. दारुखाना डॉकमध्ये विक्रांतला तोडण्यात येईल. विक्रांत युद्धनौका वाचवावी यासाठी सेनेकडून अखेरचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संरक्षण मंत्री अरुण जेटलींची भेट घेणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close