मतदानाचा हक्क बजावाच – राकेश मेहरा

April 14, 2009 10:26 AM0 commentsViews: 6

14 एप्रिल, मुंबईअमृता पंजा ' मतदान करा. कारण ती एक ताकद आहे. जबाबदारी आहे. तसंच योग्य व्यक्तीला निवडून देणं देशाच्या हितासाठी आहे, असं मत राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्स आणि स्पायकरच्या मतदानाच्या मोहिमेत व्यक्त केलं. मतदानाचं आवाहन करायला बॉलिवूड नेहमीच सरसावलेलं असतं. अगदी अभिनेत्यांपासून ते दिग्दर्शकांपर्यंत सगळेच या मोहिमेत सहभाग घेतात. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपलं मत खुलेपणाने व्यक्त केलं. दिल्ली – 6 या सिनेमानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा पहिल्यांदाच अशाप्रकारे लोकांसमोर येत आहेत. मोठ्या उत्साहाने असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्स आणि स्पायकरच्या नेतृत्त्वाखाली लोकांना मतदान करण्यासाठी जागरूक करत आहेत. याआधी या संस्थांनी आमिर खानला घेऊन मतदानावर आधारित एक जाहिरातही केली होती. "Voting is cool, you must use the power असंही राकेश म्हणाले. राकेश मेहरा यांच्या हिट ठरणार्‍या सिनेमांप्रमाणे मतदानाचा संदेशही तरुणांमध्ये हिट ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

close