ठाण्यात सापडलं पाच दिवसांचं बाळ

April 14, 2009 10:49 AM0 commentsViews: 1

14 एप्रिल, मुंबई ठाण्यातील राबोडीमध्ये आकाशगंगा परिसरात देवत अपार्टमेंटचा तळमजल्यावर सोमवारी रात्री एक पाच दिवसांचं अर्भक सापडलंय. या अर्भकाला पोलिसांच्या मदतीने ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. गेल्यावर्षभरातील अर्भक सापडण्याची ही चौथी घटना आहे. एकीकडे सायन इस्पितळातून चोरीला गेलेल्या मोहन आणि मोहिनी नेरूरकर या दाम्पत्याचं बाळ दोन महिने झाले तरीही सापडलेलं नाही तर दुसरीकडे नवजात अर्भकांना टाकलं जातंय. याप्रकरणी पोलीस शोध घेण्यासाठी अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.

close