मोदी इफेक्ट, 88वं अखिल भारतीय संमेलन बडोद्यात ?

May 28, 2014 8:03 PM0 commentsViews: 983

w43samelan28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी इफेक्ट साहित्यावरही दिसून येत आहे. कारण यंदाचं 88 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर भरवण्याची जोरदार शक्यता आहे आणि त्यासाठी गुजरातमधल्या बडोद्याचं नाव जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे.

जानेवारी 2014 मध्ये सासवडला संमलेन झालं. त्यानंतरचं यंदाचं संमेलन महाराष्ट्राबाहेर भरवावं, अशी महामंडळाचीही इच्छा असल्याचं समजतंय. पंजाबमधूनही संमेलनासाठी प्रस्ताव आला आहे. मात्र बडोद्याला जास्त पसंती दिली जातेय. दोन वर्षांपूर्वीच बडोद्याला साहित्य संमेलन भरवायचे ठरले होते. पण त्यावेळेस चंद्रपूरला संमेलन झालं.

त्यातच आता मोदी इफेक्ट मुळेही बडोद्यात संमेलन भरवण्याची शक्यता जास्त आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबद्दल अंतिम निर्णय 31 मे ला होणार्‍या महामंडळाच्या बैठकीत होईल आणि त्यानंतरच याबद्दलची औपचारिक घोषणा होणार आहे. हे संमेलन बडोद्यात झालं तर जवळपास 80 वर्षांनी बडोद्यात साहित्याचा मेळा भरेल. यापूर्वी कधी बडोद्यात संमेलनं झाली होती.

अगोदर बडोद्यात…

- 1909 मध्ये रणछोडदास किर्तीकर बडोद्यातल्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- त्यानंतर 1921 मध्ये साहित्यसम्राट न.चिं. केळकर अध्यक्ष होते.
- यानंतर 1934 मध्येसुद्धा बडोद्यात साहित्य संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष नारायण गोविंद चापेकर होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close