बोरिवलीत पत्नीनं केली पतीची हत्त्या

April 14, 2009 10:40 AM0 commentsViews: 3

14 एप्रिल, मुंबई बोरिवलीत पत्नीनं पतीची कोयत्यानं वार करून हत्त्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक कलहामुळे दोघांमधले वाद विकोपाला जाऊन त्यातून ती हत्त्या झालीये. हेमलता असं पत्नीचं नाव आहे. हेमलतानं नंतर पोलिसांत जाऊन आपला गुन्हा कबुल केला आहे. तिचा पती ज्ञानेश्वर नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सोमवारी सकाळी त्यांचं त्याच मुद्द्यावरून पुन्हा भांडण झालं. हेमलतावर असे हिणकस आरोप केल्यामुळे तिचा राग अनावर झाला. त्यामुळे तिने ज्ञानेश्वरच्या गळ्यावर कोयत्यानं 25-30 वार करून त्याची हत्त्या केली. दरम्यान, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

close