भिवंडीत रेती माफियांचा मोर्चा शेतजमिनीकडे

April 14, 2009 11:30 AM0 commentsViews: 73

14 एप्रिल, ठाणेरेती माफियांनी समुद्र आणि खाडीनंतर आपला मोर्चा आता शेतजमिनीकडे वळवला आहे. अवैध रेती उत्खनन करून ठाणे जिल्ह्यातल्या हजारो एकर शेतजमीन नापीक होणार आहे. भिवंडी तालुक्यातील गोवे गावच्या हद्दीतील खाडी किनार्‍यावर सुमारे 100 एकर शेत जमिनीवर रेती माफियांनी भले मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. याबाबत गोवे गावातील शेतकर्‍यांनी शांतीनगर पोलिसांकडे तक्रार करताच पोलिसांनी कारवाई करत रेतीने भरलेले सात ट्रक, चार जेसीबी, दोन पोकलेन मशिन्स आणि चार रेती उपसण्याची उपकरणं असं करोडो रुपयांचं साहित्य जप्त केलं आहे.

close