बेस्ट ऑफ लक , बारावीचा निकाल 2 जून रोजी

May 29, 2014 5:42 PM2 commentsViews: 2600

768712thexamresult29 मे : राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.

शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळाच्या मदतीने शालान्त परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

आता 2 जून रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी आयबीएन लोकमततर्फे बेस्ट ऑफ लक…!

निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता

शिक्षण मंडळाची वेबसाईट – https://mahahsscboard.maharashtra.gov.in

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vaibhav

    Is it ryt news..!!

  • http://www.thetechdigit.com/ Kedar Lasane

    तुम्ही [http://hsc.maharesults.in] या वेबसाईटवर सुद्धा निकाल पाहू शकता.

close