विधानसभा मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढणार-तावडे

May 29, 2014 9:47 PM0 commentsViews: 1579

xz657tawade29 मे : राज्यात विधानसभा निवडणुका भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. पण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नंतर ठरवणार असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 जागा मिळतील. त्यामुळे राज्यात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असा दावाही त्यांनी केलाय. विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निकालाच्या दिवशी भाजपने विधानसभा कुणाच्या नेतृत्वाखाली लढणार यासाठी बैठक घेतली होती आणि लवकरच नाव जाहीर करणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाजपने देशात मोदींचं नाव जसं पंतप्रधानपदासाठी जाहीर केलं तसंच राज्यातही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यार असल्याचे संकेत दिले होते.

त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. ‘आमचा मुख्यमंत्री होईल’ यावरुन सेना आणि भाजपची छुपी रस्सीखेच सुरू झाली होती. सेनेच्या नेत्यांनी पोस्टरबाजी करून ‘अब की बार उद्धव ठाकरे सरकार’ असा संदेश दिला होता. एवढंच नाहीतर शिवसेनेनं फेसबुकवर देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र ? असं का ? असा सवालही उपस्थिती केला होता. त्यामुळे भाजपने आस्ते कदम घेत मुंडेंच नाव आता पुढे केले आहे. यावर सेना काय प्रतिक्रिया देईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close