सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगात मुक्काम वाढला

May 29, 2014 10:34 PM0 commentsViews: 644

asd22subrata roy

29 मे : सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा तिहार तुरुंगात मुक्काम आणखी वाढला आहे. रॉय यांना अजूनही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. सुब्रतो यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवावं अशी सहाराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगातच रहावं लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाने सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयना त्यांच्या बँक ऑफ चायनाकडे गहाण असलेत्या तीन मालमत्तांचं मूल्यमापन करायला संागितलंय. सुप्रीम कोर्टाने सध्यातरी रॉयना त्यांच्या घरीच अटकेत ठेवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

सहाराने यापूर्वी 5 दिवसात 3 हजार कोटी रूपये भरण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आणखी 15 दिवसांनी 2 हजार कोटी रूपये भरू असंही त्यांनी म्हटलं होतं. आपण बँक गॅरंटी 60 दिवसात देऊ असं सहाराने म्हटलंय. यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close