पुणे महापालिका बनणार राज्यातली सगळ्यांत मोठी महापालिका

May 30, 2014 9:19 AM0 commentsViews: 2570

PMC

30 मे :  पुणे महापालिका आता राज्यातली सगळ्यांत मोठी महापालिका बनणार आहे. कारण पुणे महापालिकेच्या क्षेत्रफळात आता दुपटीनं वाढ होणार आहे.पुणे शहराच्या हद्दीलगतच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे शहराची हद्द आता जवळपास दुप्पट होणार आहे.

क्षेत्रफळानुसार पुणे महापालिका राज्यात दोन नंबरची महापालिका ठरली आहे. पुणे शहराचे सध्याचे क्षेत्रफळ 265 चौरस किलोमीटर असून 34 गावांच्या समावेशानंतर 465 चौरस किलोमीटर एवढं शहराचं क्षेत्रफळ होणार आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेनं 18 डिसेंबर 2013 रोजी मंजूर करून सरकारकडं मंजूरीकडं पाठवला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेआधी मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close