मोठं विमान येणार

May 30, 2014 10:20 AM0 commentsViews: 1523

30 मे :  भारतामध्ये आज एअरबस A380 हे विमान दाखल होणार आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या अशा या डबलडेकर एअरक्राफ्टमध्ये 471 सीट्स आहेत. यात 12 सुट्स, 60 बिझनेस क्लास सीट्स आणि 399 इकॉनॉमी सीट्स आहेत.

भारतासाठीच्या फ्लाईट्सना हे विमान वापरणारी सिंगापूर एअरलाईन्स ही पहिली कंपनी असेल. मुंबई ते दिल्ली सुरू होणार्‍या सिंगापूर एअरलाईन्सच्या फ्लाईट्स या आता एअरबस A380 च्या असतील. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिल्लीत ही पहिली एअरबस ए380 दाखल होईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close