माझा जीवन प्रवास अभ्यासक्रमात नको – मोदी

May 30, 2014 11:48 AM0 commentsViews: 2730

modi book30  मे :  चहा विक्रेता ते देशाचा पंतप्रधान असा मोदींच्या आयुष्यावर बेतलेल्या धड्यांचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याचा विचार काही राज्यात सुरू असल्याचे वृत्त होते. त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीचं विरोध दर्शवला आहे.

‘हयात असलेल्या व्यक्तींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये’ असं मत मोदी यांनी व्यक्त आज ट्विटवरून केलं आहे. भाजपचं सरकार असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशात शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मोदींच्या आयुष्यावर बेतलेल्या धड्यांचा समावेश करण्याचा आनंदीबेन पटेल आणि शिवराज सिंह चौहान यांचा विचार असल्याचं वृत्त होतं. त्यानंतर मोदी यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मोदींच्या या ट्विटनंतर गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारनं अभ्यासक्रमात मोदींचा समावेश करण्याचा निर्णय रद्द केला आहे.

मोदींनी काय ट्विट केलं
‘मला असं ठामपणे वाटतं की हयात असलेल्या व्यक्तींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू नये. देशाला आकार देणार्‍या अनेक महान व्यक्ती भारतात होऊन गेल्यात. तरुण विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल वाचून त्यांचे अनुकरण करावे’. असं ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close