‘अच्छे दिन’, संरक्षण आणि रेल्वेत 100 टक्के FDI ?

May 30, 2014 2:10 PM0 commentsViews: 7211

30  मे : defence नव्याने स्थापन झालेल्या मोदी सरकारचं लवकरच पहिलं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये आर्थिक धोरण सुधारणा जाहीर होण्याची शक्यता आहे. यात संरक्षणापाठोपाठ रेल्वेतही 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकी (FDI)ला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

त्याबरोबरच पायाभूत आणि बांधकाम क्षेत्रातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण क्षेत्रात एफडीआयची मर्यादा वाढवण्याची शिफारस करणार्‍या कॅबिनेट नोटला वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंजुरी दिली आहे.

सध्याच्या 26 टक्क्यांवरुन ही मर्यादा वाढवून 100 टक्के करण्याची शिफारस या कॅबिनेट नोटमध्ये करण्यात आली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतून येणारी गुंतवणूक तर वाढेलच पण सोबतच देशांतर्गत उद्योगालाही चालना मिळेल अशी अपेक्षा केंद्र सरकार बाळगून आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close