‘ते’ 35 कोटी कुठून आले ? माहिती द्या, IT ने राष्ट्रवादीला सुनावले

May 30, 2014 5:24 PM0 commentsViews: 3961

23it_ncp30 मे : 35 कोटी रुपयांच्या बेहिशेबी निधी प्रकरणी मुंबई आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस बजावली होती याला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर पाठवलंय. राज्यभर कुपन्स वाटून हा निधी उभारल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलंय.

पण, या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झालेलं नाही. या कूपन वितरकाची संपूर्ण माहिती कळवावी, अशा सूचना आयकर विभागाने केल्या आहेत. लोकसभा निवडणूक काळात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या काळात राष्ट्रवादीच्या खात्यात मोठ्या प्रमाणात बेनामी रक्कम जमा झाली.

गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या खात्यात तब्बल 61.5 कोटी रुपये जमा झाले, त्यापैकी 35 कोटी रुपये रोख जमा झाले होते. त्यापैकी 20.75 कोटी रुपये जमा करणार्‍यांचे नाव किंवा पॅन क्रमांक याची माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बँक खात्यात 35 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. पण, हे पैसे कुठून आले, याची माहिती देण्यात आली नव्हती. याबद्दल इन्कम टॅक्स विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस बजावली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close