लोकसभा निवडणूक पहिला टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस

April 14, 2009 1:28 PM0 commentsViews: 1

14 एप्रिललोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकप्रचाराचा आज शेवटचा दिवस संपला आहे. संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पहिल्या टप्प्यात म्हणजे येत्या गुरूवारी देशभरातल्या 124 मतदार संघात मतदान होणार आहे. यापैकी राज्यात 13 म्हणजेच विदर्भातले 10 आणि मराठवाड्यातल्या 3 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. राज्यात एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री, दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्य मंत्रीमंडळातला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री यांचं भवितव्य लवकरच ठरणार आहे. काँग्रेस आघाडीतील मोठ्या प्रमाणावरील बंडखोरी आणि बहुजन समाज पक्षाचा प्रभाव या दोन गोष्टी इथल्या राजकारणासाठी महत्त्वाच्या आहेत.

close