राज ठाकरे आज बोलणार, धक्कातंत्र वापरणार ?

May 31, 2014 12:21 PM0 commentsViews: 5609

98raj_thakarey_4प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

31 मे : लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या मनसेनं आपली औकात तपासण्यासाठी जनतेला साद घातली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जाहीर सभा होती आहे. लोकसभा निवडणुकीतला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सभेत राज ठाकरे धक्का तंत्राचा वापर करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘या मला तुमच्याशी बोलायचंय’ या राज ठाकरे यांच्या जाहिराती मुंबईभर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एरव्ही आक्रमक असलेल्या राज ठाकरेंनी या वेळी प्रेमाने लोकांना निमंत्रण दिलंय. लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर राज ठाकरेंची भाषा मवाळ होणार का ? याबद्दल सगळीकडे उत्सुकता आहे. कारण पराभवानंतर राज पहिल्यांदाच बोलणार आहेत. मुंबईतल्या सोमय्या ग्राऊंडवर होणार्‍या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी उत्साही मनसे नेत्यांनी राज यांना मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार म्हणून जाहीर केलंय. त्याबद्दलही राज बोलतील. यापूर्वी जेव्हा शिवसेनेचा असाच दारुण पराभव झाला होता, तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेचं प्रमुखपद सोडलं होतं. तशा धक्कातंत्राचा वापर राज करतील की भावनिक आवाहन करतील हे सर्व कळेल.

लोकसभेतला पराभव, शिवसेना-भाजप महायुतीला मिळालेले यश, मत विभागणीबद्दल लोकांची बदललेली भावना या सर्व बाबी लक्षात घेत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close