‘अच्छे दिन’, अमेरिकेचा दूत चर्चेसाठी लवकरच भारतात

May 31, 2014 12:56 PM0 commentsViews: 2387

v42usa_obama31 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहिष्कार टाकणारी अमेरिका आता मोदींसोबत काम करण्यासाठी उत्सुक असून आज आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेने आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद वाढवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करायला सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट-निशा बिस्वाल या मोदी सरकारशी चर्चा करायला भारतात येणार आहेत. 6 ते 9 जूनच्या दरम्यान, त्या मोदी सरकारशी बातचीत करतील. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेसोबतची ही पहिली बोलणी असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी मोदी यांच्यासोबत काम करण्यास अमेरिका उत्सुक असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितलंय. भारताचे अमेरिकेतले राजदूत एस जयशंकर यांनी जॉन केरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी केरी यांनी त्यांच्याकडे ही बाब स्पष्ट केली. तसंच अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना फोनही केला होता.

मोदींच्या शपथविधीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रथमच वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींचं अभिनंदनही केलं. तसंच या अगोदर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले त्यानंतर लगेल अमेरिका सरकारने मोदींबद्दल भूमिका मवाळ केली. खुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नाहीतर मोदींना आमंत्रणही दिलंय. आता मोदींना ए वन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. गुजरात दंगली प्रकरणामुळे अमेरिकेनं मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close