सज्ज आम्ही !

May 31, 2014 3:23 PM0 commentsViews: 774

31 मे : पुण्यातील नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीच्या 126 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज पार पडला. दिमाखदार संचलन आणि त्याला असलेली विमानांच्या हवाई कसरतींनी हा सोहळा शानदार झाला. यावेळी एअर चीफ मार्शल अरुप रहा यांनी कॅडेट्सना संबोधित केले.126 व्या तुकडीत हरियाणाच्या राहुल काडियन ने सुवर्णपदक पटकावलंय तर गोरखपुरच्या विवेक यादव याने रौप्य, जम्मुच्या सुर्या प्रकाशने कांस्य पदक पटकावलंय. तिघांनीही आर्मी जॉईन करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close