अझलन शहा हॉकी स्पर्धा विजेती टीम इंडिया मायदेशी परतली

April 14, 2009 3:20 PM0 commentsViews: 1

14 एप्रिलतब्बल 14 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीम सोमवारी रात्री भारताची ही विजयी टीम मायदेशी परतली. अझलन शाह ट्रॉफी आपल्या नावावर केल्यामुळे आता भारतीय हॉकीचं चित्र नक्कीचं बदलेल अशी आशा सगळ्यांनाच वाटते आहे. यावेळी भारतीय हॉकी टीमच्या चेहर्‍यावरही हाच विश्वास झळकत होता. जवळजवळ पाच वर्षांच्या दुष्काळानंतर भारताच्या हॉकी टीमनं परदेशात स्पर्धा जिंकल्याचा आनंद टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहर्‍यावर दिसत होता. या विजयामुळे भारतीय खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास दिसत असल्याचा टीमचा गोलकिपर ऍड्रीयनने सांगितलं. तर गळ्यात असलेलं गोल्ड मेडल वेगळीच प्रेरणा देऊन जातं असंही दिलीप तर्कीने यावेळी बोलताना सांगितलं. यानिमित्तानं हॉकीला चांगले दिवस येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!

close